Marathi Leaflet: Family is Still Family

Marathi: कुटुंब आजही कुटुंबच आहे….प्रेम आजही प्रेमच आहे…

Marathi Leaflet: Family is Still Family

कुटुंब आजही कुटुंबच आहे….प्रेम आजही प्रेमच आहे…

अनेक पालकांची आणि कुटुंबांची एखादी प्रिय व्यक्ती लेस्बीयन, गे, बायसेक्श्युएल किंवा ट्रान्सजेन्डर  [एलजीबीटी] असते. जेव्हा अशा प्रिय व्यक्तीचे ’खरे रूप’ बाहेर येते, तेव्हा कुटुंबातील सदस्यांना प्रश्न पडणे  अगदी स्वाभाविक आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खालील काही महत्वाची तथ्ये सुरुवातीलाच जाणून घ्यावेत.:

कोणाशी किंवा कसे प्रेम करावे याची निवड लोक करत नाहीत.

एलजीबीटी म्हणून ओळखले जाणे हा काही निवडीचा

किंवा अपघाताचा भाग नाही. खरं तर,  यूएस मध्ये राहणा-या आशियाई-प्रशांत बेटांच्या लोकसंख्येपैकी  सुमारे325,000 किंवा 2.8% लोक हे एलजीबीटी आहेत, असे लॉस एन्जल्स येथील कॅलिफोर्निया विदयापीठाच्या लॉ स्कूलच्या विल्यम्स संस्थेचे म्हणणे आहे. जेव्हा कि, लैंगिक कल आणि लैंगिक ओळख नक्की कशा प्रकारे निश्चित केले जातात, हे कोणालाही माहिती नसताना, एलजीबीटींपैकी  बहुतांश लोकांना त्यांच्यातील वेगळेपणा फार कमी वयात लक्षात येतो.

  • पालक किंवा त्यांच्या एलजीबीटी अपत्याने काहीही चुकीचे केलेले नाही.

एलजीबीटींच्या पालकांसाठी सुरुवातील अपराधी आणि लाजीरवाणे वाटणे या भावना सामान्य आहेत; मात्र आई-वडिलांमुळे मुले एलजीबीटी होत नाहीत. एखाद्याने एलजीबीटी व्हावे यासाठी कोणतेही पर्यावरणीय कारणे नाहीत. एलजीबीटी असणे म्हणजे अपत्य जसे आहे तसे अ सणे होय. कुटुंबाद्वारे स्वीकार करण्याने आरोग्य व स्वास्थ्याची भावना वाढल्याचे संशोधनात आढळून आले आहे. कुटुंबाचे प्रेम आणि आधारामुळे आत्म-विनाशी वर्तन जसे की अंमली पदार्थांचे सेवन, आरोग्याला घातक ठरणा-या गोष्टी आणि आत्महत्या इ. यांची जोखीम कमी होते.

  • एलजीबीटी लोक आनंदी व यशस्वी जीवन जगतात

अनेक एलजीबीटी लोक परिपूर्ण आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतात. यूएस आणि जग झपाट्याने बदलत आहेत. अधिकाधिक राज्ये आणि देश समानलिंगी विवाहांना मान्यता देत आहेत. विल्यम्स इन्स्टिट्यूटला आढळले आहे की, समानलिंगी विवाहातील 33,000 आशियाई-प्रशांत बेटांच्या लोकसंख्येपैकी [एएपीआय]  पैकी 26 % लोक मुलांना वाढवत आहेत. तसेच, एलजीबीटी व्यक्ती या यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. अनेक व्यवसाय, कंपन्या, यंत्रणा आणि विनानफा संघटना उघडपणे आपल्या एलजीबीटी कर्मचा-यांचे समर्थन करीत आहेत.

  • अधिकाधिक श्रद्धा परंपरा या ’उत्क्रांत’ होत आहेत.

अनेक श्रद्धा परंपरा आणि धर्म हे एलजीबीटी लोकांना स्वीकारण्यासाठी उत्क्रांत होत आहेत. काही ग्रंथात विशिष्ट काळातील विचारसरणी आणि संस्कृतीचे वर्णन केले गेले आहेत. एलजीबीटी लोकांना स्वीकारणे हे करुणा, प्रेम, दयाळू ईश्वर यांच्यासारख्या दृढ धार्मिक आणि अध्यात्मिक मूल्ये आणि स्वत:ला जसे वागवावे वाटेल तसेच इतरांना वागवावे यावर भर देणे आहे हे अनेक श्रद्धा परंपरांना मान्य झाले आहे.

  • जग हे सर्वांसाठी अधिक चांगले बनवा.

अनेक राज्ये आणि नागरी अधिकार कायदे एलजीबीटी लोकांचे रक्षण करतात. तरीही, जे वेगळे आहेत त्यांच्याबद्दल भेदभाव बाळगण्याची शक्यता आहेच. निष्पक्ष, सुरक्षित आणि वंश, वांशिकता, नैसर्गिक अधिवासाची जागा, इमीग्रेशन स्टेटस, लैंगीक कल किंवा लिंग ओळख काहीही असले तरी परस्परांबद्दल आदर यांनी भरलेले जग निर्माण करण्याची जवाबदारी आपली आहे.

  • स्वत:ला आणि इतरांना शिक्षित करा.

. सहाय्य आणि संसाधने उपलब्ध आहेत.  PFLAG ( आपल्या एलजीबीटी निकटवर्तीयांना सहाय्य करणा-या पालकांसाठी, कुटुंबांसाठी आणि मित्रांसाठी),  नॅशनल क्विअर एशिअन-पॅसिफिक आयलॅन्डर अलायन्स (NQAPIA) आणि द एशियन प्राईड प्रोजेक्ट हे आपल्या व आपल्या कुटुंबासाठीची संसाधने आहेत.  त्यांच्याशी www.pflag.org, www.nqapia.org, www.asianprideproject.org. वर संपर्क साधा.

तुम्ही एकटे नाही !

 

Download the Family is Family – Marathi PDF.

Watch the PSA video in English.